दिल्ली मॉडेलवर औरंगाबाद मध्ये 'आप' लढवणार महानगरपालिका

Foto
औरंगाबाद - आम आदमी पार्टीने महानगरपालिका निवडणुकीत सर्वच्या सर्व जागा लढविण्याची तयारी केली आहे. दिल्लीतील विकास  मतदारांपर्यंत पोहोचवून मते मागण्यात येणार आहेत. तर इच्छुक उमेदवारांना आजपासूनच अर्ज वाटप करण्यात येणार असल्याची माहिती शहराध्यक्ष सुरेश माने यांनी दिली.
            आम आदमी पार्टीने महानगरपालिकेच्या निवडणुकीत मोठ्या ताकतीने उतरण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षसंघटना आता दिल्लीतील विकासाचे मॉडेल शहरवासीयांना समोर ठेवण्याची तयार करीत आहे. दिल्ली निवडणुकीचा निकाल ११ फेब्रुवारीला लागणार आहे. या निकालानंतर शहरात संपर्क अभियान राबवून पक्ष महानगरपालिका निवडणूक प्रचारला प्रारंभ करेल. त्यानंतर इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीही घेण्यात येणार आहेत. संपर्क कार्यालयातून आजपासूनच इच्छुक उमेदवारांना अर्ज वाटप करण्यात येणार असल्याची माहिती शहराध्यक्ष सुरेश माने यांनी दिली.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker